💥 ब्रेकिंग न्यूज💥
गडचिरोली (ता.१६जुलै):- गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे २०१९पासून औषधी खरेदी घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याच्या अनेक तक्रारी असलेल्या औषधी निर्माण अधिकारी श्री. महेश प्रभाकर देशमुख यांच्यावर आर्थिक अनियमताचा ठपका ठेवत उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांनी आज १६ जुलै रोजी निलंबनाचे आदेश धडकले.
त्यांच्या बाबतच्या तक्रारी पालकमंत्री,सहपालकमंत्री यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी त्या तक्रारीची चौकशी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत करण्यात यावी असे आदेशित केल्यानंतर जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी चौकशी समिती गठित करून त्या चौकशी अहवालात आर्थिक अनियमयता झाल्याची शक्यता वर्तवून त्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत उपसंचालक आरोग्य सेवा यांना कळविले त्यानुसार सहसंचालक, अर्थ व भांडार, आरोग्य सेवा मुंबई यांनी तपासणी केल्यानंतर सुद्धा त्यामध्ये आर्थिक अनियमितता आढळून आल्याने त्यांनी नियुक्त प्राधिकारक उपसंचालक यांना निलंबन करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार उपसंचालक आरोग्यसेवा नागपूर यांनी त्यांना निलंबित करून त्यांचे मुख्यालय रजेगाव, ता. जि. गोंदिया येथे दिलेला आहे.
याबाबत जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांना विचारले असता याबाबत “मी तुम्हाला सांगू शकत नाही” अशी प्रतिक्रिया दिली.