मंत्रीमंडळ सुद्धा गठीत
चामोर्शी( ता.१८):- पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुणघाडा रै येथे लोकशाही पध्दतीने शालेय निवडणुक घेण्यात आली. विद्यार्थ्यांना मतदान हि संकल्पना समजावी आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा तसेच लोकशाही संसदीय पद्धत आणि गुप्त मतदान संकल्पनांचा अनुभव मिळावा यासाठी इ व्ही एम मशीन द्वारे निवडणुक घेण्यात आली.
या निवडणुकीमध्ये शिक्षकांनी मतदान अधिकाऱ्यांची भूमिका बजावली, तर १-७ वर्गातील सर्व विद्यार्थी मतदार म्हणून सहभागी झाले. यात उमेदवारी फॉर्म भरणे, प्रचार करणे यासाठी मतदानाच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. मोबाईलद्वारे डमी evm मशीन म्हणून वापर करण्यात आला.इतकेच नाही तर मतदारांच्या बोटाला शाई सुद्धा लावण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व्यवस्थित पार पडली.सदर मतदार प्रक्रियेतून मुख्यमंत्री म्हणून सिद्धी संतोष काटवे, उपमुख्यमंत्री पूजा महेश दूधबळे, चांदणी नरेंद्र कुणघाडकर यांची निवड करण्यात आली. तसेच इतर उमेदवारातून सांस्कृतिक व उपक्रम मंत्री, स्वच्छता मंत्री, पोषण आहार मंत्री, परसबाग मंत्री,बालभवन मंत्री, आरोग्य मंत्री यांची निवड करण्यात आली.
निवडणूक प्रकिया शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास भोयर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. तसेच लीलाधर वासेकर, वर्षा गौरकार, रेखा हटनागर, निमाई मंडल, प्रीती नवघडे, गौतम गेडाम, रोशन बागडे व शाळेतील विद्यार्थी यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आली.