शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, शिवसेना नेते सुरेंद चंदेल यांची विशेष उपस्थिती.
आरमोरी ( ता.२३):- येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना शिंदे गटाने मोर्चेबांधणीस सूरवात केली असुन दिनांक 23 जुलै बुधवारी आरमोरी येथील विश्रामगृहात आरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यातील पक्ष सदस्य नोंदणी व पक्ष बांधणी संदर्भात आढावा बैठक पार पडली.
शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला शिवसेना सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार,शिवसेना नेते सुरेंद्र सिंह चंदेल यांची विशेष उपस्थिती होती.
आरमोरी विधानसभा क्षेत्र हा शिवसेनेचा गड राहिला असुन या क्षेत्रात तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचली आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणीस सुरवात केली असून शिवसेनेचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्रावर शिवसेनेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी आरमोरी येथील विश्रामगृहात पक्षसदस्य नोंदणी व पक्षबांधणीचा आढावा घेण्यात आला.
आरमोरी, देसाईगंज, कोरची व कुरखेडा तालुक्यातील तालुका प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे व सहसंपर्कप्रमुख प्रमूख हेमंत जंबेवार यांच्या नेतृत्त्वात या चारही तालुक्यात पक्षसंघटना मजबुतीसाठी अथक प्रयत्न करण्यात आले त्यामुळे पक्षाचा प्रभाव या तालुक्यात निर्माण झाला आता जोडीला शिवसेना नेते सुरेंद्र सिंह चंदेल आल्याने पक्षात एक उत्साह संचारला असुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात यश संपादन करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्याना जोमाने कामाला लागण्याचे आदेश या आढावा बैठकीत देण्यात आले.
या बैठकीत आरमोरी, देसाईगंज, कोरची, कुरखेडा तालुका प्रमुखांनी जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, हेमंत जंबेवार यांच्या नेतृत्वात चारही तालुक्यात पक्ष विस्तार वेगाने झाला असुन त्यांच्या संघटन कौशल्य व प्रभावी नेतृत्वामुळे चारही तालुक्यात शिवसेनेचा झेंडा तळागाळापर्यंत नेण्यात यश आले असुन पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्याचा फायदा येणाऱ्या स्थानिक निवडणूकीत दिसणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच सुरेंद्र सिंह चंदेल यांच्या पक्षात येण्यामुळे कार्यकर्त्याला बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली.
या बैठकीत जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, सहसंपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, शिवसेना नेते सुरेंद्र सिंह चंदेल यांनी मार्गदर्शन केले व पक्षबांधणीचा आढावा घेतला.
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख दीपक भारसाकडे, आरमोरी विधानसभा प्रमूख नारायण धकाते, कोरची तालुका प्रमुख कृष्णा नरडांगे, देसाईगंज तालुका प्रमुख ज्ञानेश्वर कवासे, कुरखेडा तालुका प्रमुख अनिकेत आटवरे, अविनाश गेडाम, नंदूभाऊ चावला, पुंडलिक देशमुख, दशरथ लाडे, अरुण शेडमाके व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.