आकाश अग्रवाल यांच्या गोडाऊनमधून भरलेला तांदूळ निकृष्ट दर्जाचा आढळला!
गडचिरोली (ता.४):- देसाईगंज येथील व्यापारी आकाश अग्रवाल यांच्या गोडाऊनमधून भरून विशाल राईस मिल, कुरुड येथून निकृष्ट दर्जाचा तांदूळ शासकीय गोडाऊन, गडचिरोली येथे पाठविण्यात आला. तांदूळ निकृष्ट दर्जाचा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात पंचनामा करून वाहतूक पाससह सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून शासकीय धान्य पुरवठा व्यवस्थेतील गंभीर अनियमिततेचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हा प्रकार अन्न व नागरी पुरवठा विभागासह जिल्हा प्रशासनासाठी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.गरीब लाभार्थ्यांसाठी असलेला शिधा माल असा निकृष्ट स्वरूपात गोडाऊनमध्ये पोहोचणे, ही केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर संशयास्पद आणि भ्रष्ट पद्धतीची साखळीच दर्शवते.अशाच प्रकारे अन्य पुरवठा धारकांनी पुरवठा केलेला धान्य सुद्धा अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून तपासणी करावी अशी मागणी श्री.कृष्णा वाघाडे, उपाध्यक्ष , गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय मानवाधिकार संगठना,नई दिल्ली करीत आहेत.