चामोर्शी (ता.१३):- चामोर्शी येथे दि.१२/०८/२०२५ रोजी शिवसेना गटाचा पक्षप्रवेश व आढावा बैठक पार पडली. पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली काल चामोर्शी तालुक्यातील अनेक महिलांनी शिवसेना गटात पक्षप्रवेश घेतला.
चामोर्शी तालुक्यात जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, महिला संपर्कप्रमुख वर्षाताई मोरे,बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशीतभैया मिस्त्री, जिल्हा संघटक राकेशभैय्या भैस,चामोर्शी तालुकाप्रमुख पप्पी भाऊ पठाण यांच्या नेतृत्वात अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश घेतला.
यासोबतच शिवसेना पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये समोर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला प्रत्येक ग्रामपंचायतीवर भगवा फडकवायचा असल्याने प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने व नियोजित पद्धतीने काम करावे असे मार्गदर्शन जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लाडक्या बहिणींचा असलेल्या प्रेमाखातीर तालुक्यातील अनेक महिलांनी शिवसेनेला प्राधान्य दिल्याने आज महिलांचा भव्य असा पक्षप्रवेश झाला असे मत महिला आघाडीचा अध्यक्ष वर्षाताई आत्राम यांनी मांडले.
तसेच चामोर्शी तालुक्याचे तालुकाप्रमुख पप्पी पठाण यांनी या वेळेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चामोर्शी तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये शिवसेना पक्ष भगवा फडकवेल असे आश्वासित केले. येणाऱ्या काळात गडचिरोली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेशभाऊ बेलसरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात भगवा फडकणारच. गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण नगर परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद यावर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व सहपालकमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली भगवामय होणार.