अश्विनी सदाशिव देशमुख,गडचिरोली यांनी साकारली नक्षलमुक्त गडचिरोलीच्या विकासात गडचिरोली पोलिसांचा सहभाग याचा देखावा.

गडचिरोली (ता.३१):- घरगुती गणपती सजावट ह्यात त्यांच्या गणपतीची थीम आहे नक्षलमुक्त गडचिरोलीच्या विकासात गडचिरोली पोलिसांचा सहभाग यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते नक्षलजोडपे सरेंडर होत आहेत त्यांच्या बाजूला पोलीस अधीक्षक आणि बॉडीगार्ड असं दाखविले आहे. सरेंडर होत असतांना मुख्यमंत्री साहेब त्यांना भारतीय संविधानाची प्रत देऊन त्यांचं आत्मसर्पणाचे स्वागत करत आहेत. त्यानंतर या पूर्ण सजावटीचे आकर्षण वर्दीतला बाप्पा आहे. त्याच्या हातात हिंसाचार सोडा आणि विकासाचा मार्ग निवडा असा संदेश आहे. नक्षलांनी त्यांच्या पायाशी शस्त्रे अर्पण करून आत्मसमर्पण स्वीकारले आहे.असं त्यांनी त्यांच्या देखाव्यात दाखविले आहे. त्यानंतर गडचिरोली पोलीस दलामार्फत शेती प्रशिक्षणामुळे एक शेतकरी आपल्या शेतात आधुनिक पद्धतीने पिके भाजीपाला पिकवतांना आहे त्यानंतर वन पर्यटक विकास या गोष्टीला आता पुढे गडचिरोली जिल्ह्यात चालना मिळणार असल्याने एक प्री गोष्ट यात दाखविली आहे भविष्यात घडणारी गोष्ट दाखवली आहे. तब्बल 75 वर्षांनी दुर्गम भागात बस सुविधा आणि बसचे आगमन हे सुद्धा ह्या देखाव्यात दाखविले आहे त्यानंतर शाळा आणि आरोग्य केंद्र याचा विकास तसेच तब्बल 79 वर्षांनी दुर्गम भागात पहिल्यांदा भारताचा तिरंगा फडकला हे सुद्धा दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यानंतर गावातील एक महिला दुर्गम भागातील पारंपारिक जीवन पारंपारिक भांडी आणि पारंपारिक घरी हे या देखाव्यात मी दाखविण्याचा एक छोटा प्रयत्न केलेला आहे आणि ही महिला खास म्हणजे विकासाची रांगोळी तिच्या दारात काढते आहे असे दर्शविले आहे
