शिवसेना तालुकाप्रमुख गौरव बाला व युवा नेते संदिप कोरेत यांच्या नेतृत्वात.
मुलचेरा (ता.१९ जुलै):- मुलचेरा तालुक्यातून अहेरी उपविभागाला जोडणारा व तालुक्यातूनच जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची झालेल्या बकाल अवस्थेला कारणीभूत आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला झोपेतून उठवण्यासाठी व तालुक्यातील प्रमुख रस्त्याला खड्डेमुक्त करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्या मार्गदर्शनात युवा नेता अहेरी विधानसभा संदीप कोरेत यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख गौरव बाला यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मुलचेरा यांना निवेदन देण्यात आले.
सुरजागड वरून लोहखनिज वाहतूक आलापल्ली आष्टी महामार्गावर असलेल्या खमण चेरू वरून मोठ्या प्रमाणावर शेकडो ट्रॅक च्या माध्यमाने होत असल्यामुळे व अतिशय खराब असल्यामुळे सुरक्षितेच्या दुष्टिकोनातून उपविभागातील बहुतांश लोक मुलचेरा मार्गाचा वापर करीत आहेत पण सध्या आलापल्ली ते मुलचेरा- आष्टी जाण्यासाठी असलेला रोड सध्या शेवटचा घटका मोजत आहे? रोडवर प्रत्येक ठिकाणी मोठ-मोठाले खड्डे पडलेले आहेत, त्यामुळं रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे दररोज या रस्त्यावर अपघात होत आहेत शेकडो गाड्या या रस्त्यावरून गडचिरोली/चंद्रपूर करिता ये जा करीत असतात बस ने सुद्धा जात असताना या रोडवरून दररोज नागरिकांना तारेची कसरत करावी लागत आहे, आजपर्यंत या रस्त्यावरून ये जा करणारे शेकडो वाहने खराब झालेले आहेत आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसलेला आहे परंतु या रोड बाबत कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्याबाबत प्रशासनाने अजून पर्यंत कुठली कारवाई केली नाही आणि याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सुद्धा दुर्लक्ष असलेला पाहायला मिळत आहे. दररोज या रस्त्यावरून किरकोळ अपघात झालेले अनेक नागरिक दिसून येतात परंतु या रोडची दयनीय अवस्था व शेवटच्या घटका मोजत असताना संबंधित विभागाला यांची पुसटशी कल्पना नसणे हि मनाला चटका देणारी आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला झोपेतून उठवून त्याच्या रस्ता दुरूस्ती कार्याची जाणीव करून देण्यासाठी शिवसेना तर्फे जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्या मार्गदर्शनात युवा नेता संदीप कोरेत यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख गौरव बाला यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. निवेदनाची दखल घेऊन रस्ता दुरुस्ती च्या कामाला सुरुवात करावी अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईल ने रस्त्यासाठी आंदोलन करेल असे इशारा देण्यात आले निवेदन देतांना मुरारी देवनाथ, राहुल बिस्वास, राकेश बिरडू, दिवाकर मेडी, राकेश आत्राम व ईतर शिवसेना कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.