कोठरी अरण्यवास येथील बुध्द विहाराचे सर्वांगीण विकास झाला पाहिजे-डॉ.प्रणयभाऊ खुणे, प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रीय मानवाधिकार संघटना

   

       कोठरी(चीफ ब्युरो)दि.०४ नोव्हें:– गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कोठरी अरण्यावास येथे दरवर्षी आयोजित वर्षावास समापन सोहळ्यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी आज सदिच्छा भेट दिली व येथे भगवान गौतम बुद्ध यांचे दर्शन घेतले व येथे आलेल्या बौद्ध समाज बांधव यांच्या सोबत चर्चा केली यावेळी येथील भंते भगीरथ यांचे सोबत येथील विविध प्रलंबित असलेल्या विकासात्मक विषयावर चर्चा केली या ठिकाणी काही विकास कामे राज्य सरकारने मंजूर केले आहेत परंतु अजून पर्यंत येथील कामे सुरू झाले नाही याबद्दल डॉ.प्रणय खुणे यांनी खंत व्यक्त केला.गडचिरोली जिल्ह्यातील निसर्गरम्य वातावरणात वसलेला एकमेव बौद्धविहार आहे.
एकमेव अप्रतिम कोठरी बुद्ध विहार खरोखरच खूपच प्रेक्षणीय आहे व सदर स्थळाचा विकास होणे गरजेचे आहे येथे दरवर्षी आयोजित वर्षावास समापन सोहळ्यात संपूर्ण राज्यातून हजारो बौद्ध समाज बांधव, उपासक-उपासिका तथा देशभरातील बौद्ध भिक्षुक या ठिकाणी भेट देतात या ठिकाणी विविध बौध्द बांधवांच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी वर्षावास कार्यक्रमानिमित्त येथे यात्रेचे स्वरूप निर्माण होत असते.

              यात्रे दरम्यान येथे आलेल्या उपासक उपासिकेची आवश्यक व्यवस्था येथील भन्ते भगीरथ व गावाकऱ्यांच्या वतीने करण्यात येते राज्य शासनाने या बौद्ध विहारास (क) वर्ग पर्यटन स्थळ दर्जा दिलेला आहे,परंतु अजून पर्यंत या ठिकाणी विद्युत लाईटची व्यवस्था येथे पोहोचली नाही व अनेक विकासात्मक कामे आजही प्रलंबित आहे येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणयभाऊ खूणे यांनी सांगितले या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ.प्रणयभाऊ खुणे यांनी केले त्यांनी आज तालुक्यातील अनेक समाज बांधव यांचे सोबत संवाद साधले यावेळी प्रामुख्याने राष्ट्रिय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाभाऊ वाघाडे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top