आष्टी(चीफ ब्युरो ) दि.०७ :– क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पूणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली आणि गडचिरोली जिल्हा बुडो मार्शल आर्ट संस्था, आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्हा स्तरीय शालेय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेचे आयोजन दिनांक ११ आक्टोबर २०२४ रोज शूक्रवारला आष्टी येथील सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा ,आष्टीच्या पटांगणावर आयोजीत करण्यात आलेला आहे.
गडचिरोली जिल्हास्तरीय शालेय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेला जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावे असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे तसेच स्पर्धा आयोजक गडचिरोली जिल्हा बुडो मार्शल आर्ट संघटनेचे अध्यक्ष कपिल मसराम यांनी केलेले आहे. ज्या खेळाडूंना सदर स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोलीशी संपर्क साधावा.