गडचिरोली ( ता.१४):- गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा पदभार नेमका कोणाकडे ? असा असलेला पेच कायम आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अहेरी व आरमोरी क्षेत्रातून दोन जिल्हाप्रमुख पदाची घोषणा करण्यात आली परंतु त्या घोषणेने जिल्ह्यातील शिवसैनिक नाराज असल्याचे हायकमांडला कळल्याने त्यांनी जिल्हाप्रमुख पदाच्या घोषणेला स्थगिती दिली.
नागपूर येथील विदर्भ आढावा बैठकीत संजयजी मोरे, सचिव, शिवसेना यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख नियुक्ती बाबत लवकरात लवकर निर्णय घेतल्या जाईल.
आज सहपालकमंत्री आशिषजी जयस्वाल गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी यावर मी यावर भाष्य न केलेले बरे यावर वरिष्ठ निर्णय घेतील असे सांगितले म्हणजे जिल्हाप्रमुख पदाचा पेच आशिषजी जयस्वाल यांच्या कडून सुद्धा अनुत्तरित आहे.