
गडचिरोली ( ता:-०७):– ग्रामपंचायत कोनसरी अंतर्गत येत असलेल्या नाल्या मागील दोन वर्षांपासून उपसा न झाल्यामुळे मुसळधार पावसाचा पाणी संपूर्ण घरामध्ये घुसत आहे. काल मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने कोनसरी गावातील नागरिकांच्या घरामध्ये अक्षरशः नालीतील पाण्याची नदी वाहत होती. संबंधित ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी यांचा कोनसरी गावातील मुलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील दोन वर्षांपासून कोनसरी हा गाव औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. लायॅट्स मेटल्स एनर्जी लिमिटेड कडून वार्षिक लाखो रुपये टॅक्स वसूल केल्या जाते तरीसुद्धा गावातील नाल्या न उपसल्याने स्थानिक नागरिकांच्या घरात पाणी जाऊन आरोग्याला धोका होतो याकडे संबंधित ग्रामपंचायती कडून दुर्लक्ष केल्या जाते. ग्रामपंचायत मधील पदाधिकारी कंपनीकडून कोट्यावधी रुपयांच्या कंत्राट घेण्यात व्यस्त असल्याने ग्रामपंचायतकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. ज्या जनतेने त्यांना निवडून दिले त्या गावातील जनतेकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.
तरी याकडे तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अशी ग्रामपंचायतवासीयांची मागणी आहे.
