
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील सफाईदार व मनुष्यबळ पुरवठा मुजोर कंपन्यांवर प्रशासन कारवाई करणार की नाही? – वंचितचा सवाल !

गडचिरोली (ता.०९):– गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला व बाल रुग्णालय येथील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला व बाल रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.पेंदाम यांनी मंगळवार रोजी संयुक्त मिटींग बोलावली होती, या मिटींगसाठी ओझोन असोसिएट व एमव्हीजी कंपनीच्या डायरेक्टरांना बोलाविण्यात आले होते परंतु मुजोर कंपन्याचे डायरेक्टर सोडाच परंतु कंपनीचे कोणीही प्रतिनिधी मिटींगला आले नाही.
जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनी कंपनीच्या प्रतिनिधी यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी त्यांना सुद्धा कुठलाही प्रतिसाद दिला नाही.त्यामूळे संयुक्त मिटींगच रद्द करावी लागली. अशी नामुष्की संबंधीत प्रशासनावर ओढवली असेल तर सामान्य कामगाराचे काय हाल होत असतील? मुजोर कंपन्यांवर कोणाचेच अंकूश नसून प्रशासन हतबल झाले, अशा मुजोर कंपन्यावर प्रशासन कारवाई करणार की नाही? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांनी केला आहे.
