
सिरोंचा( दि. ८ ):- सिंरोंचा तालुक्यातील टेकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय “102 रुग्णवाहिका “वरील कंत्राटी वाहनचालकास वैद्यकीय अधिकाऱ्याने शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मधुकर बापुराव चंद्रागिरी (वय 25), रा. वेनलाया, ता. सिरोंचा हे प्राथमिक आरोग्य केंद्र टेकडा येथे कंत्राटी वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 2.30 वाजता ते ड्युटीवर उशिरा पोहोचल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन मातकर (वय 35, रा. टेकडा) यांनी त्यांना ” तेरी अबसेंटी डाला, चले जा, साले माज गया क्या तु” अशा शब्दांत शिवीगाळ केली. त्यानंतर डॉ. मातकर यांनी संतापाच्या भरात चंद्रागिरी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीव घेण्याची धमकी दिली
मारहाणी दरम्यान उजव्या हाताला दुखापत होऊन फिर्यादीचा खांदा निखळल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. या घटनेबाबत फिर्यादीने पोलीस स्टेशन सिरोंचा येथे तोंडी अहवाल दिला असून, पोलिसांनी त्यावरुन गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. परंतु अद्यापही आरोपी अटकेत नाही. या घटनेमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांला निलंबित करण्याची मागणी कर्मचारी वर्ग करीत आहे.
“सदर प्रकरणात चौकशी समिती गठित करून चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल” – डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प गडचिरोली
#Sironcha #PHCTekda #AssaultCase #GadchiroliPolice #knewsVidarbha @KnewsVidarbha #मारहाण#प्राथमिकआरोग्य
