दुर्लक्षित रस्त्यावरील खड्डयांत ग्रामवासीयांचा वृक्षारोपण
गडचिरोली (दि.०१ जुलै):- मौजा पोर्ला येथे भारत सरकारचा हर घर जल या योजने अंतर्गत गावातील प्रत्येक घराला नळ जोडणी करण्यासाठी जिल्हा परिषद यांनी ज्या कंत्राटदाराला काम दिले त्या कंत्राटदाराने गावातील संपूर्ण रस्ता मधोमध फोडून नळलाईन टाकली. संबंधित कंत्राटदाराला नवीन टाकून झाल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करून देण्याचे त्याच्या कंत्राटामध्ये नमूद असताना दोन वर्षांपूर्वी करोडो रुपये खर्च करून पोर्ला ग्रामपंचायत मध्ये सिमेंट करण्याचे रस्ते बनवण्यात आले. परंतु जल जीवन यंत्रणे अंतर्गत त्या रस्त्यांची दुरव्यवस्था झाल्याने पावसाळ्यात संपूर्ण रस्ते चिखलमय झाल्याने गावकऱ्यांना या चिखलाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार करून सुद्धा यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. किंवा त्या रस्त्याची डागडुजी केली नाही.
त्यामुळे गावातील नागरिकांनी रस्त्याच्या चिखलात झाडे लावून या प्रकरणाचा निषेध नोंदवला. या निषेधात श्री.मनोहर कुंभरे श्री.रविंद्र सेलोटे श्री.पंकज राऊत श्री.पंकज येवले श्री.कृष्णा भोयर, श्री.योगेश करनेवार श्री.योगेश म्हशाखेत्री श्री. हिमांशू शिवणकर ,श्री आदित्य लोढे श्री.वेदांत पाल श्री.राहुल अलोने श्री.कृणाल भोयर श्री सतिश मलोडे श्री.गौरव कासारे श्री.अतुल देशमुख यांनी सहभागी झाले.या निषेधाने तरी शासनाला जाग येईल का? असा सवाल गावकरी करीत आहेत.