गडचिरोली जिल्ह्यातील मानव हक्क ( ग्राहक संरक्षण ) विषयावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातून जागतिक पातळीवर प्रणय खुणे यांच्या कार्याची दखल !
गडचिरोली (चीफ ब्युरो)दि.०६ ऑक्टो.:- जागतिक स्तरावरील साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीच्यावतीने दरवर्षी चेन्नई येथील गुरुकुल येथे आयोजित संपूर्ण देशभरातील प्रत्येक राज्यातून विविध कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या युनिव्हर्सिटीच्या वतीने जागतिक स्तरावरील मान-सन्मानाचा मानद डॉक्टरेट उपाधी दिली ०५ ऑक्टोबरला गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात व प्रामुख्याने मानवाधिकार ( मानवी हक्क व ग्राहक संरक्षण) क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्यात उत्कृष्ट कार्याबद्दल कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील रहिवासी प्रणयभाऊ खुणे यांना मानद डॉक्टरेट उपाधी बहाल केली. त्यांनी जिल्ह्यात केलेल्या मानवाधिकार क्षेत्रात (मानवी हक्क, ग्राहक संरक्षण) विषयवार उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तसेच आपल्या शासकीय सेवेदरम्यान विविध गाव खेड्यात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल जागतिक स्तरावरील साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने घेतली व दरवर्षी संपूर्ण भारत देशातून प्रत्येक राज्यातील एका सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानद डॉक्टर उपाधीने प्रदान करून सन्मान केला जातो. यामध्ये प्रणय भाऊ खुणे यांची निवड करण्यात आली आणि त्यांना डॉक्टर ऑफ सोशल वर्क चे स्पेशलायझेशन इन हुमन राइट्स कंजूमर राइट्स प्रोटेक्शन (मानवी हक्क व ग्राहक संरक्षण) या विषयावर त्यांना चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय गुरुकुल येथे मानद डॉक्टरेट उपाधी प्रदान करण्यात आली.
यावेळी वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीचे वतीने मिस्टर सेलवम, चेअरमन ग्लोबल एचीवर कौन्सिल यांच्या मार्गदर्शनात मिस्टर यार कानन भारतीय चित्रपट निर्माता, अॅडव्होकेट साथी असलिन , ऑल इंडिया अॅडव्होकेट फेडरेशन, डॉ.जे.पी.विमल डायरेक्टर शिबा ग्रुप ऑफ स्कूल चेन्नई ,डॉ.यू.पी. कृष्णन, डॉ.जॉन पीटर ओसबॉर्न , सिने अभिनेता सेनेमाराई चेन्नई, मिस्टर स्नेहील , सिनेअभिनेता काम बाम ( मीना) सेल्वी, डॉ, मिलिंद दहिवडे, मेंबर ऑफ मायनॉरिटी कमिशन दिल्ली, डॉ.पुण्यमूर्ती, चेअरमन तमिळनाडू कंजूमर पीपल राईट प्रोटेक्शन मुव्हमेंट चेन्नई , व चेन्नई येथील गुरुकुलचे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
या सन्मानाबद्दल नानाभाऊ नाकाडे,राष्ट्रीय सल्लागार,कोहळी समाज, विवेक बुद्धे,जिल्हा उपाध्यक्ष, देवानंद पाटील खुणे, राहुल भाऊ झोडे, मार्गदर्शक, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे, ज्ञानेंद्र विश्वास, राष्ट्रीय प्रवक्ता,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे, पौर्णिमा, राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी, पायल कापसे, विदर्भ अध्यक्ष महिला आघाडी, जावेद अली, विदर्भ अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, रमेश अधिकारी, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना गडचिरोली, गुड्डू भाऊ खुणे, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रीय मानवाधिकार संघटना गोंदिया, नंदू भाऊ समरीत,जिल्हाध्यक्ष,राष्ट्रीय मानवाधिकार संघटना भंडारा, प्रकाश भाऊ गजपूरे, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रीय मानवाधिकार संघटना चंद्रपूर, मनीषाताई मडावी,जिल्हाध्यक्ष,महिला आघाडी,राष्ट्रीय मानवाधिकार संघटना,गडचिरोली, लोकेशभाऊ डोंगरवार, कृष्णा भाऊ वाघाडे, उपाध्यक्ष,राष्ट्रीय मानवाधिकार संघटना गडचिरोली, लक्ष्मीताई कन्नाके, उपाध्यक्ष,महिला आघाडी, भीमराव वनकर, तालुकाध्यक्ष भामरागड,तेजस्विनी भजे, जाहेदा शेख, व संपूर्ण पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रणयभाऊ खुणे यांचे अभिनंदन केले.