अहेरी(प्रतिनिधी ) दि.४ नोव्हें.:- राजे अम्ब्रीशराव आत्राम गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील रंगयापल्ली येथील घनश्याम विस्तारी जोडे वय 38 यांचा गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय उपचार घेत असताना अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्याकडे मृतदेह नेण्यासाठी व वाहन करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना पैसे नव्हते.हा प्रकार अचानक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना माहिती मिळताच लगेच मोठे बंधू बापू जोडे व कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना पार्थिव घेऊन येण्यास सांगितले. आम्ही संपूर्ण मदत करू तुम्ही काळजी करायची गरज नाही. जिल्ह्यात कुठेही कश्याप्रकारचे व वैद्यकीय गरज भासल्यास राजे अम्ब्रीशराव आत्राम मदतीला धावतील असे आवाहन केले.