गडचिरोली (ता.१८ जुलै) हेमंतभाऊ जंबेवार, जिल्हासंपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुख राकेशभाऊ बेलसरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्षात घेता ही बैठक घेण्यात आली.
माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील तालुकाध्यक्ष व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली बैठकीचा मुख्य उद्देश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे ठेवायचे आहे. गाव तिथे शाखा व शाखा तिथे कार्यकर्ता असे सांगितले. बाराही तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेचे उमेदवार देणार आणि जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणार असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेशभाऊ बेलसरे यांनी सांगितले.
या आढावा सभेला ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेंद्रभाऊ चंदेल, छायाताई कुंभारे,तालुकाप्रमुख वसंतभाऊ गावतुरे, तालुकाप्रमुख पप्पू भाऊ पठाण, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशितभैया मिस्त्री, उपजिल्हाप्रमुख अविनाश भाऊ, युवासेना जिल्हाप्रमुख दिपक बारसागडे ,युवासेना रक्षित पोटवार,राकेशभाऊ भैस व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.