नवग्राम येथे शिवसेनेचा विजयघोष — विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.

गडचिरोली ( ता.२४):- चामोर्शी तालुका येथिल नवग्राम मध्ये रविवार, दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेना घोषणांनी दुमदुमून गेला. आढावा बैठकीच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमात विविध पक्षांमधून, विशेषतः बंगाली समाजातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली.

कार्यक्रमाला बंगाली आघाडीचे जिल्हा प्रमुख मा. असितजी मिस्त्री, महिला जिल्हा प्रमुख बंगाली आघाड़ी मा.सौ.सपनाताई मंडल, महिला तालुका प्रमुख बंगाली आघाड़ी सौ पिंकीताई अजय सरकार, बंगाली आघाड़ी युवासेना जिला प्रमुख जगदीश भाऊ मंडल, युवासेना तालुका प्रमुख अविभाऊ पुछलवार, तालुका संघटक सोनुभाऊ पेरगुरवार, शिव सैनिक नारायण मंडल, प्रकाश मंडल, सौ पुष्पा दास यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऐक्याचे दर्शन घडले.

शेकडो बंगाली समाजातील कार्यकर्त्यांनी पक्षाचा भगवा झेंडा स्विकारत “जय महाराष्ट्र”, “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणा देत वातावरण रंगवले. या वेळी चामोर्शी तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक तसेच महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

जिल्हा प्रमुख मा. राकेशजी बेलसरे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “शिवसेना हा स्थानिकांना प्राधान्य देऊन त्यांचा विकास करणारा पक्ष आहे‌.”  पक्षप्रवेशाच्या या ऐतिहासिक क्षणी, नवे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी एकमताने सांगितले की, शिवसेनेच्या विचारसरणी आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळेच त्यांनी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक पातळीवर विकासकामांना गती देणे, समाजातील वंचित घटकांचे प्रश्न सोडवणे आणि एकजूट निर्माण करणे ही आपली प्राथमिकता राहील, असे त्यांनी जाहीर केले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top