ठिय्या आंदोलनास यश..

गोमणी उपवनपरिक्षेत्रातील क्षेत्रसहाय्यक व वनरक्षक निलंबित.

गडचिरोली (२० जून ):-  गडचिरोली वनवृत्तातील आलापल्ली वनविभागा अंतर्गत पेडीगुडाम वनपरिक्षेत्रातील गोमणी उपवनपरीक्षेत्रातील मुखडी टोला खंड क्र.१३२ येथील बीट कुपकटाई करता करोडो रुपयाचे जिवंत सागाचे लाकुड तस्करी करण्यात आली. यामध्ये या उपपरीक्षेत्रातील वनक्षेत्र सहाय्यक व वनरक्षक यांनी आर्थिक हेतुपोटी तस्करांना सहकार्य केले अशी तक्रार श्री.शंकर ढोलगे यांनी तक्रार दाखल केली होती.

त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही म्हणून त्यांनी व त्यांच्या सहकारी यांनी कारवाईसाठी १९ जून पासून मुख्य वनसंरक्षक (प्रादे.) गडचिरोली यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या ठिय्या आंदोलनाची वन प्रशासनाने दखल घेऊन गोमणी उपपरिक्षेत्रातील श्री नरेंद्र सिडाम, वन क्षेत्रसहाय्यक व श्री सचिन मस्के,वनरक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे.

यासाठी मुख्य वनसंरक्षक (प्रादे.) गडचिरोली यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनात श्री शंकर ढोलगे,श्री क्रिष्णा वाघाडे, श्री रवींद्र सेलोटे,श्री विलास भानारकर, श्री प्रवीण ठाकरे बसलेत.

याच प्रमाणे उर्वरित मागण्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top