मंत्री गिरीश महाजनांचा गडचिरोली वंचितने केला जोरदार निषेध.

प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप.

 

गडचिरोली (चीफ ब्युरो)दि.२७:– नाशिक येथिल प्रजासत्ताकदिन समारंभात ग्राम विकास मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करतांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करून जोरदार निषेध करीत अनुसूचीत जाती – जमाती कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथिल इंदिरा गांधी चौकात निषेध आंदोलनातून करण्यात आला.

गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील प्रजासत्ताकदिन कार्यक्रमाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असून तमाम फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भावना दु:खावल्या गेल्या आहेत, गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

प्रजासत्ताक कार्यक्रम स्थळी प्रत्यक्ष गिरीश महाजनांच्या समोरासमोर निषेध व्यक्त करणा-या रणरागिनी माधवी जाधव यांचा यावेळी कौतुक करून पाठींबा जाहिर करण्यात आला.

निषेध आंदोलनात गिरीश महाजन, भाजपा राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.    या निषेध आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे, जेष्ठ नेत्या वनिता बांबोळे यांनी केले.

यावेळी आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा प्रशांत देव्हारे, निरीक्षक जी के बारसिंगे, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बंसोड, प्रतिक डांगे, गुलाब मडावी, वंचितचे शहराध्यक्ष तुळशिराम हजारे, तालुका उपाध्यक्ष मनोहर कुळमेथे, युवा नेते सिध्दांत बांबोळे, साहिल बोदेले, जेष्ठ नेते सुखदेव वासनिक, सिद्धार्थ गोवर्धन, नागसेन खोबरागडे अमर खंडारे, प्रेमनाथ सोनटक्के, शांतीलाल लाडे, भगवान राऊत, खेमचंद ईंदुरकर, सुनिल उराडे, भारत रायपूरे, प्रेमदास रामटेके, निलम दुधे, नामदेव दुधे, पद्मा कांबळे, वैशाली वनकर, ज्योती उराडे, लता भैसारे, योगिता सहारे, अहिल्या सहारे, संघमित्रा राजवाडे, राहुल मेश्राम आदी शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top