राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडचिरोली जिल्ह्यात भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा; जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी

गडचिरोली(चीफ ब्युरो) ता.१२: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता अभिनव लॉन, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष मा. श्री. रविंद्र प्र. वासेकर भूषविणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार आहे. जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना दिशा देणे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देणे, हा मेळाव्याचा प्रमुख उद्देश असल्याचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी सांगितले.

रविंद्र वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला व विविध आघाड्यांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

मेळाव्यास पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top